S M L

...या गावाला 'काळ्या पाण्याची' शिक्षा !

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2015 08:24 PM IST

...या गावाला 'काळ्या पाण्याची' शिक्षा !

osmanabad_water02 फेब्रुवारी : उस्मानाबादच्या कावळेवाडीतल्या लोकांना गेली 5 वर्षं दूषित पाण्याचा पुरवठा होतोय. तेरणा कारखान्याचं सांडपाणी शिवारात मुरल्यानं विहिरी, बोअरवेल यांना दूषित पाणी येतंय. प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही. त्यामुळे अनेकांवर गाव सोडून जायची वेळ आलीये. गेल्या 5 वर्षांपासून हे गाव जणू 'काळ्या पाण्याची' शिक्षाच भोगतंय.

उस्मानाबाद तालुक्यातील कावळेवाडी गाव हे गेल्या 5 वर्षांपासून दूषित पाणी पुरवठा केला जातोय. तेरणा कारखान्याच्या सांडपाणी शिवरात मुरल्यामुळे कावळेवाडी परिसरात विहीर, बोअरवेलला काळे दूषित पाणी येतंय हे पाणी पिल्याने गावकरी आजराने त्रस्त झाले आहेत. सतत होणार्‍या दूषित पाणी पुरवठ्यामुळे गावातील लोकांनी हे पाणी पिण्याचे सोडून दिले आहे. परिसरातील विहिरींना दूषित पाणी येते. त्यामुळे जमिनी नापीक होत चालल्या आहेत. पिण्यासाठी शेतीसाठी दूषित पाणी असल्यामुळे अनेक जण गाव सोडून गेले आहेत. तर नातेवाईक रावळेगावात येत नाहीत. जी लोक गावात राहतात काळ्या पाण्याने त्रस्त झाले आहेत. अनेक तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्यात पण गांभिर्याने पाहत नाही. एकंदरीत काय तर-गेल्या 5 वर्षांपासून कावळेवाडी गाव काळ्या पाण्याची शिक्षा भोगताय असंच दिसतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2015 08:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close