S M L

शाहरूखच्या 'मन्नत'बाहेरचा रॅम्प काढून टाका - पूनम महाजन

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2015 03:51 PM IST

शाहरूखच्या 'मन्नत'बाहेरचा रॅम्प काढून टाका - पूनम महाजन

मुंबई (03 फेब्रुवारी) :  भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी अभिनेता शाहरूख खान याच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेरचा रॅम्प काढून टाकण्याची मागणी केली आहे. इथल्या रहिवाश्यांच्या तक्रारीची दखल घेत पूनम महाजन यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पत्राद्वारे 'मन्नत'च्या बाहेरील रॅम्प काढून टाकण्याची मागणी केली.

शाहरूखच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेर असणार्‍या सिमेंटच्या रॅम्पचा वापर शाहरूखची व्हॅनिटी व्हॅन ठेवण्यासाठी करण्यात येतो. मात्र, या रॅम्पमुळे या ठिकाणचा रस्ता छोटा झाल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे हा रॅम्प हटविण्यात यावा, अशी मागणी रहिवाश्यांकडून वारंवार करण्यात येत होती. सप्टेंबरमध्ये भरणार्‍या माऊंट मेरी जत्रेदरम्यान या रॅम्पमुळे मोठी गैरसोय होत असल्याचेही इथल्या लोकांचं म्हणणं आहे. आता या प्रकरणात पूनम महाजन यांनी लक्ष घातल्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, या संपूर्ण प्रकरणात लवकर न्याय मिळेल, अशी स्थानकांची आशा आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2015 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close