S M L

भ्रष्टाचारी बाबूंना नोकरीवरून काढून टाका -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2015 11:20 PM IST

भ्रष्टाचारी बाबूंना नोकरीवरून काढून टाका -मुख्यमंत्री

03 फेब्रुवारी : भ्रष्टाचाराने बरबटलेल्या बाबूगिरीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक पाऊल उचलले आहे. भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हे सिद्ध झालेल्या 28 अधिकारी आणि कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाका असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसंच ही कारवाई झाली नाही तर संबंधित विभागाच्या प्रमुखांवर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यंत्रणेला कारणीभूत ठरणार्‍या बाबूशाहीला आवर घालण्यासाठी फडणवीस सरकारने कठोर निर्णय घेतलाय. शासकीय काम करून घेण्यासाठी लाचेची मागणी करणारे आणि ती घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांवर न्यायालयात खटले दाखल आहे. याबाबतच्या कार्यवाहीत काही अधिकारी-कर्मचार्‍यांना न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षाही ठोठावल्या आहेत. मात्र त्यातील काही अधिकारी-कर्मचार्‍यांवर संबंधित विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने ते अद्यापही शासकीय सेवेत कार्यरत आहेत. अशा अधिकार्‍या आणि कर्मचार्‍यांची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना आज दिले. तसेच या दोषी ठरलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई न होण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकार्‍यांकडूनही खुलासे मागविण्यात यावेत, असे आदेशही त्यांनी आज दिले. त्यामुळे आता बेहिशेबी मालमत्ता आणि लाचखोरीचे गुन्हे सिद्ध झालेल्या विविध सरकारी कार्यालयांमधले वर्ग 1, 2, 3 चे 28 अधिकारी, कर्मचारी गोत्यात आलेत. या 28 अधिकार्‍यांपैकी बहुतेक अधिकारी महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि विक्रीकर खात्याचे आहेत. विशेष म्हणजे मागील महिन्यात राज्यातील वेगवेगळ्या प्रकरणातील आठ भ्रष्ट अधिकार्‍यांची कोट्यवधीची माया आता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. यामुळे रायगडचे उपजिल्हाधिकारी नितीश ठाकूर यांची 143 कोटींची मालमत्ता यात जप्त होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2015 08:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close