S M L

मुंबईत 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Feb 4, 2015 12:37 PM IST

rape_634565

मुंबई (04 फेब्रुवारी) : मुंबईत आणखी एक सामूहिक बलात्काराती धक्कादायक घटना समोर आली आहे. काळाचौकीजवळ कॉटनग्रीन परिसरात रे रोड रेल्वे स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रक यार्डमध्ये नेऊन तीन नराधमांनी 21 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. सोमवारी पहाटे ही घटना घडली असून याप्रकरणी काळाचौकी पोलीसांनी तीन तरुणांना अटक केली आहे.

 ही तरुणी अंधेरी परीसरात राहणारी आहे. माहिम दर्गा इथे दर्शनाकरता जात असताना तीन मुलांनी तिच्याशी ओळख केली आणि दर्शनाकरता दर्ग्यावर नेतो असं सांगून कॉटनग्रीन परीसरातील ट्रक यार्ड पार्क केलेल्या एका ट्रकमध्ये नेऊन तिघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

यानंतर त्या तिघा नराधमांनी पीडित तरूणीला पोलिसांत तक्रार दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पण या धमक्यांना न घाबरता पीडित मुलीने धाडस करून थेट काळाचौकी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार केली.

तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे काळाचौकी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या नराधमांना शोधून काढले आणि अटक केली. याप्रकरणी तिघंही आरोपींना कोर्टानं 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2015 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close