S M L

अहमदनगरमध्ये कॉन्स्टेबल दीपक कोलते यांची निर्घृण हत्या, आरोपी फरार

Samruddha Bhambure | Updated On: Feb 4, 2015 02:31 PM IST

CrimeScene2

(04 फेब्रुवारी) : अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबलची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेवगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला.

दीपक कुलथे असं मृत्यूमुखी पडलेल्या कॉन्स्टेबलचं नाव आहे. पाठीत तीक्ष्ण हत्यार भोसकून कॉन्स्टेबल दीपक कोलते यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील तीनही आरोपी फरार आहे.

सुरेश कापसे या आरोपीचा तपास करण्यासाठी कोलते शेवगावमध्ये गेले होते, त्याच आरोपी आणि त्यांच्या दोन साथीदारानं कोलते यांची हत्या केली. कोलते हे बोधेगाव पोलीस ठाण्यत कार्यरत होते. विशेष म्हणजे आरोपी सुरेश कापसेला पकडण्यासाठी दीपक कोलते गेले असता त्यावेळच्या झटापटीत त्यांचा हात मोडल्यानं ते 15 दिवस सुट्टीवर होते. कालच ते कामावर रुजु झाले होते. कापसे हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर मोकाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

ही हत्या सराईत गुन्हेगाराने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस अधिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2015 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close