S M L

तुम्ही ठरवा फडणवीस सरकारचं रिपोर्टकार्ड IBN लोकमतवर

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2015 04:42 PM IST

तुम्ही ठरवा फडणवीस सरकारचं रिपोर्टकार्ड IBN लोकमतवर

04 फेब्रुवारी : तब्बल 15 वर्षांनंतर भाजप सरकारला सत्तेचं फळ चाखायला मिळालं. आता नव्या कोर्‍या फडणवीस सरकारला येत्या 7 फेब्रुवारीला 100 दिवस पूर्ण होत आहेत. गेल्या 100 दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने काय काम केलं ?, लोकं फडणवीस सरकारच्या कामावर समाधानी आहेत का ?, मंत्र्यांची कामगिरी कशी वाटली ?, त्यामुळेच आम्ही घेतोय टीम देवेंद्रचा 100  दिवसांचं रिपोर्ट कार्ड 'टीम देवेंद्र @100' .

यासाठी आम्ही आमच्या वेबसाईट ibnlokmat.tv वर तयार केलाय एक रेटिंग बोर्ड. या रेटिंग बोर्डमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, गिरीश महाजन आणि सेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे, डॉ. दीपक सावंत,चंद्रशेखर बावनकुळे या टॉप 13 मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्र्यांची कामगिरी तुम्हाला कशी वाटली यासाठी तुम्हाला रेटिंग द्यायचंय.

कसं करणार रेटिंग ?

रेटिंग बोर्डवर प्रत्येक मंत्र्यांच्या नावाखाली पाच स्टार (*****) आहेत. या स्टारला आपण क्लिक करायचं. तुम्ही अर्धा स्टार ते पूर्ण पाच स्टार रेटिंग देऊ शकता. रेटिंग दिल्यानंतर तुमचं मत यशस्वीपणे नोंदवलं गेलं असं सांगणार एक 'पॉप्प' कॉम्प्युटरवर झळकणार.  प्रत्येक स्टार हा 0.1 ते 5.0 इतका अर्थात 1 ते 10 या प्रमाणात आहे. समजा तुम्ही अर्ध स्टार रेटिंग दिलं तर ते 0.1 इतकं असेल. आणि समजा तुम्ही 2 स्टार रेटिंग दिलं तर ते 2.0 म्हणजे 4 इतक रेटिंग असेल. सर्वात महत्वाचं तुम्ही एका कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, टॅबवरून एकदाच रेटिंग करू शकता. दुसर्‍यांदा करू शकणार नाहीत. मग काय वाट कसली बघता द्या रेटिंग ठरवा मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड...

या मंत्र्यांचं ठरणार रिपोर्ट कार्ड

- एकनाथ खडसे -महसूल, कृषी आणि उत्पादन शुल्क मंत्री

- सुधीर मुनगंटीवार - अर्थ व वन खाते

- विनोद तावडे - मनुष्य बळ, शालेय शिक्षण

- चंद्रकांत पाटील - PWD आणि सहकार खाते

- पंकजा मुंडे - ग्रामविकास, महिला बालविकास

- सुभाष देसाई - उद्योग खाते

- दिवाकर रावते - परिवहन खाते

- रामदास कदम - पर्यावरण खाते

- एकनाथ शिंदे - MSRDC खाते

- डॉ.दीपक सावंत - आरोग्य खाते

- चंद्रशेखर बावनकुळे -ऊर्जा खाते

- गिरीष महाजन - जलसंपदा खाते

- गिरीश बापट - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2015 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close