S M L

आजी-माजी 21 आमदार भाजपमध्ये येणार,दानवेंचा गौप्यस्फोट

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2015 11:06 PM IST

आजी-माजी 21 आमदार भाजपमध्ये येणार,दानवेंचा गौप्यस्फोट

उस्मानाबाद (04 फेब्रुवारी): महाराष्ट्रातील तब्बल 21 आजी-माजी आमदार भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. उस्मानाबाद येथे भरलेल्या भाजपच्या सदस्य नोंदणी अभियान आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

मी अध्यक्ष झाल्यापासून 5 माजी आमदारांना पक्षात प्रवेश दिला आहे. आता येणार्‍या काळात भाजपमध्ये 21 आजी माजी आमदारांना

प्रवेश देणार असून त्यांची यादी तयार आहे. पक्षश्रेष्ठीची संमती घेवून लवकरच प्रवेश देणार आहे असं दानवे म्हणाले. दरम्यान, दानवे यांनी केलेला गौप्यस्फोट हा शिवसेनेला इशारा तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. लवकरच या आमदारांची यादी माध्यमांना दिली जाईल असे सांगत दानवे यांनी पत्रकार परिषदेत मात्र या विषयाला बगल दिला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2015 11:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close