S M L

अबब, महापौरांच्या ड्रायव्हरचा वर्षाला पगार फक्त 26 लाख !

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2015 04:17 PM IST

अबब, महापौरांच्या ड्रायव्हरचा वर्षाला पगार फक्त 26 लाख !

मुंबई (05 फेब्रुवारी): एका ड्रायव्हरचा पगार वर्षाला 26 लाख...!! हे ऐकून कुणालाही विश्वास बसणार नाही. पण असं घडलंय देशाची आर्थिक राजधानी मुंबई महापालिकेत. मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांच्या ड्रायव्हरच्या पगारावर थोडे-थोडके नाही तर तब्बल 26 लाख रुपये खर्च केले आहे अशी माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आलीये.

मुंबई महानगर पालिका एका व्यक्तीच्या वाहन चालकावर वर्षाला तब्बल 26 लाख रुपये खर्च करतेय. या खर्चावरुन हा चालक नक्की गाडी चालवतो की हेलिकॉपटर असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. आता तुम्हाला शंका आली असेल की, हा ड्रायव्हर नक्की कुणाचा तर हा ड्राईव्हर आहे, मुंबईच्या प्रथम नागरिक महापौर यांचा. मुंबई महापालिकेनं महापौरांच्या ड्रायव्हरच्या, फक्त पगारावर वर्षाला 26 लाख रुपये खर्च केले आहेत. माजी महापौर सुनील प्रभू यांच्या कार्यकाळात वर्ष मार्च 2013 - मार्च 2014 ला महापौरांना देण्यात येणार्‍या तीन गाड्यांच्या ड्रायव्हरच्या पगारावर ही रक्कम खर्च झालीये. या ड्रायव्हरच्या पगारावर दर महिन्यांला 1 लाख रूपये खर्च करण्यात आला. आणि धक्कादायक म्हणजे, ड्रायव्हरला 13 लाख रुपयांचा ओव्हरटाईम देण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेनं माहितीच्या अधिकारात ही माहिती दिलीये. दरम्यान, महापौर हे चालकाचे पगार ठरवत नसतात, तर पालिका ठरवत असते, त्यामुळे मी केलेली उधळपट्टी नाही असं स्पष्टीकरण सुनील प्रभू यांनी दिलं.

महापौरांच्या ड्रायव्हरवर असा झाला खर्च ?

- महापौरांना तीन गाड्या दिल्या जातात.

- ज्यांच्यासाठी तीन ड्रायव्हर ही असतात.

- दर महिन्याला त्या तिघांना पगारापोटी 1 लाख रुपये खर्च होतो.

- अशाप्रकारे वर्षाला असे 12 लाख रुपये होतात.

- पण धक्कादायक म्हणजे महापौरांच्या ड्रायव्हरला 13 लाख रुपयांचा ओव्हरटाईम देण्यात आलाय

- म्हणजे हे ड्राईव्हर जितका पगार मिळवतात, त्याहून ही अधिक त्यांना ओव्हरटाईम दिला जातो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2015 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close