S M L

गणेश नाईक राष्ट्रवादीचं 'घर' सोडणार नाहीच !

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2015 06:54 PM IST

Ganesh naik05 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे माजी आमदार गणेश नाईक भाजपमध्ये जाणार की नाही यावर आता अखेर पडदा पडलाय. गणेश नाईक राष्ट्रवादीतच राहणार असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. गणेश नाईक आणि त्यांचा मुलगा संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या दोन्ही दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचं आश्‍वासन दिलंय असं तटकरेंनी स्पष्ट केलं.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार गणेश नाईक भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातमीने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. नाईक जवळपास भाजपच्या उंबरठ्यावर जाऊनही पोहचलेही होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाईक यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. नाईक यांची मनधरणी होऊ न शकल्यामुळे इशाराही दिला. राष्ट्रवादीने जिल्हानुसार 27 नेत्यांवर आपआपल्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. त्यावेळी गणेश नाईक यांना यातून वगळण्यात आलं होतं. राष्ट्रवादीने नाईक यांना यादीतून वगळल्यामुळे नाईक यांची हकालपट्टी झाली अशी चर्चा रंगली होती. मात्र आता यावर पडदा पडला असून गणेश नाईक राष्ट्रवादीतच राहणार असं सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2015 06:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close