S M L

भायखळ्यातील नूर मंजिल इमारतीला लागलेली आग आटोक्यात

Samruddha Bhambure | Updated On: Feb 6, 2015 11:17 AM IST

भायखळ्यातील नूर मंजिल इमारतीला लागलेली आग आटोक्यात

06 फेब्रुवारी :  मुंबईतील भायखळा इथल्या नूर मंजिल या रहिवाशी इमारतीला आज (शुक्रवारी) सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात असून या आगीत दोन सिलेंडर्सचाही स्फोट झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या.

दरम्यान, या आगीतून 20 जणांना बाहेर काढण्यात आलं असून एकूण 23 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जिवीतहानी झालाले नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2015 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close