S M L

'कोसला'कार भालचंद्र नेमाडेंना 'ज्ञानपीठ' जाहीर

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2015 10:03 PM IST

nemade3305 फेब्रुवारी : मराठी साहित्याच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक आणि 'कोसलाकार' भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यातल्या सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्कारांनं सन्मान देण्यात आलाय. त्यांच्या 'हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ' या कांदबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झालाय.

"इतके वर्ष आपण काही करण्यासाठी धडपडत असतो. काहीतरी मिळावं यासाठी प्रयत्न करत असतो. पण आज कुठे तरी याची पावती मिळालीये, ही चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. खरं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मराठीसाठी आणि मराठीतून लिखान केलं त्यामुळे हा पुरस्कार मिळाला हाच मोठा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया भालचंद्र नेमाडे यांनी सर्वात प्रथम आयबीएन लोकमतला दिली.

ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे भालचंद्र नेमाडे हे चौथे साहित्यिक ठरले आहे. कोसला, बिढार  हिंदू,जरीला आणि झूल या भालचंद्र नेमाडेंच्या प्रसिद्ध कादंबर्‍या आहेत. नेमाडे यांना याआधी पद्मश्री, साहित्य अकादमी आणि जनस्थान पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. अलीकडे, इंग्रजी माध्यम शाळांबाबतच्या आपल्या परखड मतांमुळे नेमाडे वादात होते.

यापूर्वी मराठी साहित्यातले ज्ञानपीठ

1974 - वि. स. खांडेकर ('ययाती'साठी)

1987 - कुसुमाग्रज ('विशाखा'साठी)

2003 - विंदा करंदीकर ('अष्टदर्शने'साठी)

2014 - भालचंद्र नेमाडे ('हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ'साठी)

भालचंद्र नेमाडेंची साहित्यसंपदा

कादंबर्‍या

 

कोसला

बिढार

हिंदू -जगण्याची समृद्ध अडगळ

जरीला

झूल

कविता संग्रह

मेलडी

देखणी

समीक्षा

टीकास्वयंवर

साहित्याची भाषा

तुकाराम

द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी

नेटिविझम

इंडो - अँग्लियन रायटिंग्स

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2015 03:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close