S M L

सेना-भाजपमध्ये मतभेदाची दानवेंनी दिली कबुली

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2015 07:51 PM IST

danve_on_fir06 फेब्रुवारी : देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत आणि त्यातच सेना भाजपमध्ये मतभेद असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कबूल केलंय.

भाजप आणि सेनेत मतभेद आहेत आणि सेनेच्या काही विषयांवरच्या भूमिका आम्हाला मान्य नाहीत असंही दानवे म्हणाले. आमच्या काही मुद्द्यांवर सेनेलाही आक्षेप आहे. मतभेद दूर करण्याकरता येत्या आठवड्याभरात समन्वय समितीची बैठक घेतली जाणार आहे अशी माहितीही दानवे यांनी दिली.

तसंच दानवे यांनी 14 तारखेला होणार्‍या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीवरही त्यांनी मत व्यक्त केलंय. ते आम्हाला अस्पृश्य समजत होते आता निवडणुका संपल्यात आणि दोन मोठे नेते विकासाकरता भेटतायत त्यातून राजकीय अर्थ काढू नये असंही सांगायला ते विसरले नाहीत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2015 07:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close