S M L

पंकजा मुंडे ठरल्या स्टार मंत्री, मुख्यमंत्री दुसर्‍या स्थानावर !

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2015 05:30 PM IST

पंकजा मुंडे ठरल्या स्टार मंत्री, मुख्यमंत्री दुसर्‍या स्थानावर !

06 फेब्रुवारी : टीम देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये कोणत्या मंत्र्यांची कामगिरी कशी वाटली ? असा सर्व्हे आम्ही घेतला आणि जनतेच्या विश्वासावर सार्थ ठरत बाजी मारली आहेत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी. पंकजा मुंडे यांनी सर्व्हेच्या दुसर्‍या दिवसापासून आघाडी घेतली ती विजयापर्यंत कायम राहिली. पंकजा मुंडे यांच्या कार्याला जनतेनं 5 पैकी सर्वाधिक 3.3 स्टार रेटिंग दिले आहेत. तर त्याच्यापाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेनं दुसर्‍या स्थानासाठी पसंती दिली. मुख्यमंत्र्यांना 3.2 स्टार मिळाले. या सर्व्हेत तिसर्‍या स्थानावर सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारलीये. त्यांनी विनोद तावडेंना मागे टाकून 3.1 स्टार मिळवले.

15 वर्षांच्या तपानंतर भाजप आणि शिवसेनेला सत्तेच फळ चाखण्याची संधी मिळाली. भाजपने राज्याची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवलीय. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली छोटेखानी टीम कामाला लागलीये. सोबतीला शिवसेनेचे मंत्रीही आहेच. बघता-बघता या'टीम देवेंद्र'ला शंभर दिवस पूर्ण झाले. फडणवीस सरकारने आपल्या 'सहामाही' परीक्षेतले 100 दिवस पूर्ण केले. या शंभर दिवसांतील मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यांची कामगिरी कशी वाटली ? असा माफक सवाल आम्ही उपस्थित केला. यासाठीच आमच्या वेबसाईटवर मुख्यमंत्र्यांसह 14 मंत्र्यांच्या कामगिरीचा निवाडा करण्यासाठी खास असं रेटिंग बोर्ड तयार केलंय. या रेटिंग बोर्डमध्ये वाचकांना 0 ते 5 यानुसार स्टार रेटिंग द्यायचं होतं. तीन दिवस चाललेल्या मोहिमेला वाचकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. तब्बल 90,752 वाचकांनी मंत्र्यांच्या कामागिरीला आपली पसंती दिली. अत्यंत चुरशीची अशी लढत या रेटिंग सर्व्हेमध्ये पाहण्यास मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात तर थेट लढत रंगली होती.

पहिल्या दिवशी मुख्यमंत्री आघाडीवर होते, त्यानंतर दुसर्‍या दिवशी पंकजा मुंडेंनी आघाडी घेतली ती सर्व्हेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कायम होती. पंकजा मुंडे यांना 11,760 मत मिळाली. या मतासह जनतेनं त्यांना 5 पैकी सर्वाधिक 3.3इतकी रेटिंग दिली. तर देवेंद्र फडणवीस यांना 9,542 मत मिळाली जनतेनं त्यांना 3.2 स्टार दिले.

तर तिसर्‍या स्थानावर सर्व्हेच्या पहिले दोन दिवस विनोद तावडे यांचं वर्चस्व होतं. पण अचानक तिसर्‍या दिवशी गणित बदलं आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी तिसर्‍या स्थानावर झेप घेतली. एकनाथ शिंदे यांना 8093 मतं मिळाली असून त्यांना 3.1 स्टार मिळाले. तर विनोद तावडेंना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले त्यांना 7,411 मतं मिळाली असून 3.0 स्टार मिळाले. 682 मतांनी शिंदेंनी तिसरे स्थान पटकावले. पाचव्या,सहाव्या आणि सातव्या स्थानावर सेनेच्या मंत्र्यांचा दबदबा कायम राहिला. पर्यावरण मंत्री रामदास कदम, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी अनुक्रमे जागा मिळवल्यात. तर आठव्या स्थानावर डॉ. दीपक सावंत, नव्या स्थानावर सुधीर मुनगंटीवार, दहाव्या स्थानावर एकनाथ खडसे यांना लोकांनी पसंती दिली.

त्यानंतर अकराव्या स्थानावर चंद्रकांत पाटील, बाराव्या स्थानावर गिरीश महाजन, तेराव्या स्थानावर गिरीश बापट आणि सर्वात शेवटी 14 व्या स्थानावर चंद्रकांत बावनकुळे यांना जागा मिळाली. आजपर्यंत पहिल्यांदाच वेबसाईटच्या माध्यमातून मंत्र्यांची कामगिरीबद्दल सर्व्हे घेण्याचा प्रयत्न आयबीएन लोकमतने केला. आमच्या या प्रयत्नाला जनतेनं उदंड प्रतिसाद दिला. जनतेच्या प्रतिसादामुळेच हा सर्व्हे यशस्वी होऊ शकला. त्याबद्दल वाचकांना धन्यवाद...असंच प्रेम कायम राहु द्या...!! तोपर्यंत पाहात राहा,अचूक बातमी ठाम मत, पाहा फक्त आयबीएन लोकमत....!!

असं झालं मंत्र्यांना रेटिंग

महाराष्ट्राचे स्टार मंत्री    

मिळालेली मतं                

स्टार

पंकजा मुंडे                

11,760              

3.3

देवेंद्र फडणवीस

9542

3.2

एकनाथ शिंदे

8093            

3.1

विनोद तावडे

7411

3.0

सुभाष देसाई

6726

2.9

रामदास कदम

6694

2.8

दिवाकर रावते

6024

2.8

डॉ. दीपक सावंत

5473

2.7

सुधीर मुनगंटीवार

5466

2.5

एकनाथ खडसे

5320

2.3

चंद्रकांत पाटील

5186

2.3

गिरीश महाजन

4930

  1. 2

गिरीश बापट

4860

2.1

चंद्रशेखर बावनकुळे

3267

2.0

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2015 11:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close