S M L

सर्वच सिंचन घोटाळ्यांची चौकशी होणार -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2015 11:09 PM IST

cm on mumbra07 फेब्रुवारी : विदर्भातील सिंचन घोटाळ्यासह सर्वच घोटाळ्यांची संपूर्ण चौकशी होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. एसीबीकडून होणारी कोणतीही चौकशी थांबवली नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांचीही चौकशी होणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना मागचं सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही आघाडी सरकारवर केलाय. तसंच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून कोणतीही फाईल पेंडिग ठेवली नाही. संबंधित अँटी करप्शन ब्युरोमार्फत चौकशीची कोणतीही फाईल माझ्या टेबलवर नाही. मी कोणतीही चौकशी थांबवलेली नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान,मुंबईमध्ये 6,020 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा करार आज सरकारनं एल ऍन्ड टी या कंपनीबरोबर केला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2015 11:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close