S M L

सेनेचे आमदार फोडून दगाबाजी करणार नाही -तावडे

Sachin Salve | Updated On: Feb 7, 2015 11:35 PM IST

सेनेचे आमदार फोडून दगाबाजी करणार नाही -तावडे

tawade on sena07 फेब्रुवारी : शिवसेनेशिवाय आम्हाला कमी पडणारे आमदार अपक्ष म्हणून भाजपसोबत आहेतच असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलाय. थोड्याच दिवसात राज्यातले अनेक आजी माजी आमदार आणि नगरसेवकही भाजपात येतील, पण शिवसेनेचे आमदार फोडून आम्ही दगाबाजी करणार नाही अशी ग्वाहीही तावडे यांनी दिली. तावडे सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या यात्रेला आले असताना यावेळी ते बोलत होते.

दोनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील 21 आजी-माजी आमदार भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. एवढंच नाहीतर 21 जणांची यादीही तयार आहे असा दावाही केला होता. दानवे यांच्या गौप्यस्फोटामुळे एकच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांच्या या गौप्यस्फोटावर तावडे यांनी मित्रपक्षाशी दगाबाजी करणार नाही असा खुलासा केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2015 11:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close