S M L

अमित ठाकरेंची राजकारणात एंट्री ?

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2015 10:04 PM IST

अमित ठाकरेंची राजकारणात एंट्री ?

amit thackareyमुंबई (09 फेब्रुवारी) : ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आता सक्रीय राजकारणात सहभागी होण्याच्या उंबरठ्यावर आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेही आता राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेच्या राजकारण प्रवेशाची कुजबुज सुरू झालीये.

कारण, आज पहिल्यांदाच अमित ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. मुंबईतल्या शिवाजी पार्कमधले रेन ट्री वाचवण्यासाठी बायोलॉजिकल प्रोजेक्ट राबवण्यासाठीच्या प्रोजेक्टला परवानगी द्यावी , अशी मागणी अमित ठाकरेने केलीय. किटकांमुळे रेन ट्री नष्ट होत असल्याचं अमितने सांगितलं. त्यावर पालिका अधिकारी पाहणी करुन परवानगीचा विचार करू असं उत्तर पालिका आयुक्तांनी दिलं.

त्याआधी, अमित ठाकरे मुंबईतल्या भायखळा भागात असलेल्या राणीच्या बागेजवळच्या मैदानावर गेले होते. राणीच्या बागेच्या आवारात असलेल्या भाऊ दाजी लाड म्युझियमचा विस्तार करायचा की, असलेलं मैदान तसंच राहू द्यायचं, यावरून वाद सुरू आहे. या मुद्द्यावर मनसेनं मतदान घेतलंय. अमित यांनी मैदान वाचवण्याच्या बाजूनं आपलं मत टाकलं.

यापूर्वीही अमित ठाकरे विधानसभा आणि लोकसभेत मनसेच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. तसंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आणि अमितचा चुलतभाऊ आदित्य ठाकरेंनी राजकारणात यापूर्वीच एंट्री केलीय. आता अमितही राजकारणात सक्रिय होतोय का, याची चर्चा सुरू झालीय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2015 07:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close