S M L

सिंधुदुर्गात जंगली हत्तींना पकडण्याचं थरारक मिशन !

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2015 09:39 PM IST

सिंधुदुर्गात जंगली हत्तींना पकडण्याचं थरारक मिशन !

सिंधुदुर्ग (09 फेब्रुवारी) : बिबट्या, वाघ यांना पकडण्यासाठी नेहमी रेस्क्यू ऑपरेशन होत असतात पण सिंधुदुर्गात आता हत्तींना पकडण्यासाठी धडाकेबाज ऑपरेशन हाती घेण्यात आलंय. जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशिक्षित हत्तींसह माहूत दाखल झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जंगली हत्तींनी धुडगूस घातला आहे. शेती, घरांचं जंगली हत्तींनी अतोनात नुकासन केलंय. यावर आतापर्यंत दीर्घकालीन तोडगा निघत नव्हता. या हत्तींना हाकलून कसं लावायचं, यावरच भर दिला जात होता. पण आता एक नवा तोडगा सापडलाय आणि त्यांची अमंलबजावणीही सुरू झालीय. या हत्तींचं सिंधुदुर्गातच पुनर्वसन करण्यात येईल. त्यांना तिलारी धरणक्षेत्राच्या परिसरात नेण्यात येणार आहे. त्यासाठी कर्नाटकातून चार प्रशिक्षित हत्तींसह माहूत आणि डॉक्टर्सची टीम सिंधुदुर्गात दाखल झालीय. धुमाकूळ घालणार्‍या जंगली हत्तींना प्रशिक्षितही करण्यात येईल. तिलारी धरणक्षेत्रात या हत्तींचा पर्यटनासाठीही उपयोग केला जाईल. सेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी कर्नाटकहून आलेल्या टीमचं आज स्वागत केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2015 08:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close