S M L

युती तुटली तर पुन्हा निवडणुका, राष्ट्रवादीचा इशारा

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2015 10:05 PM IST

युती तुटली तर पुन्हा निवडणुका, राष्ट्रवादीचा इशारा

10 फेब्रुवारी : दिल्लीत भाजपच्या पराभवावरुन राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली असून यात आता राष्ट्रवादीनेही उडी घेतलीये. शिवसेनेनं सत्तेतून बाहेर पडून दाखवावं जर शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर राज्यात पुन्हा निवडणूक होईल असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिलाय. तसंच भाजपवर दबावासाठी सेनेचं हे नाटक आहे असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला.

भाजपच्या पराभवावर मीठ चोळत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते' अशी खोचक टीका केली. उद्धव यांच्या टीकेमुळे भाजपने तीव्र संताप व्यक्त केल्याय. जर मोदींवर टीका करायची असेल तर सत्तेतून बाहेर पडा असा इशाराच भाजपने सेनेला दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका खपवून घेणार नाही असा इशाराही भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिला. त्सुनामीवरुन युतीत जुंपली असताना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी यात उडी घेतली. शिवसेनेचं केवळं हे दबावाचं नाटक आहे. भाजपची आजची अवस्था पाहून जास्त मंत्रिपद पदरात पाडून घेण्याचे मनसुबे आहे. शिवसेनेनं युतीतून बाहेर पडूनच दाखवावं जर शिवसेनेनं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सरकारच्या विरोधात मतदान करू किंवा तटस्थ भूमिका घेऊ असा इशारा मलिक यांनी दिला. युती जर पुन्हा तुटली तर राज्यात पुन्हा निवडणुका होतील आणि राष्ट्रवादी त्यासाठी तयार आहे असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 06:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close