S M L

दिल्लीतला पराभव मोदींचाच - राज ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Feb 11, 2015 12:33 PM IST

दिल्लीतला पराभव मोदींचाच - राज ठाकरे

11 जानेवारी :  दिल्लीतील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच पराभव असून ही लढाई मोदी विरुद्ध केजरीवाल अशीच होती असे सांगून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. मुंबईतल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

एवढ्या मोठया प्रमाणात केजरीवालांनी मिळवलेला विजय हा अभिनंदनास पात्र असल्याचे राज म्हणाले. या निवडणुकीच कोणाचे चुकले असे काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येत असतो. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. सत्तेचा जो चढ असतो त्याला उतरा हा लागतोच असं सांगत अण्णा हजारे आणि उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज यांनीही पराभवाचं खापर नरेंद्र मोदींवर फोडलं आहे. दिल्लीतील निवडणूक निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील ते आत्ताच सांगता येणार नाही, असंही ते म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2015 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close