S M L

हत्तीपकड मोहिम फत्ते, दोन हत्ती जेरबंद !

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2015 07:14 PM IST

हत्तीपकड मोहिम फत्ते, दोन हत्ती जेरबंद !

sindhudurg elephant11 फेब्रुवारी : सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालणार्‍या हत्तींचा अखेर बंदोबस्त करण्यात आलाय. आज हत्तीपकड या मिशलना यश मिळाले असून दोन हत्तींना जेरबंद करण्यात आलंय.

सिंधुदुर्गातल्या जंगली हत्तींना पकडण्यासाठी खास कर्नाटकहून एक पथक बोलावण्यात आलंय. या ताफ्यामध्ये चार प्रशिक्षित हत्ती, माहूत आणि डॉक्टरांचा समावेश आहे. या ताफ्यानं तब्बल सतरा तास प्रयत्न केला आणि मोहिमेच्या पहिल्याच दिवशी या हत्तींना ताब्यात घेतलंय. जंगली हत्तीला जेरबंद करून त्याला खास पिंजर्‍यात बंद करण्यात आलंय. सोमवारी सकाळी दहा वाजता मोहीमेवर निघालेल्या या हत्तीनी मंगळवारी पहाटे तीन वाजता या हत्तीला वनविभागाच्या आंबेरी तळावर आणलं. आणखीही एका हत्तीला बेशुद्ध करण्यात आलंय. दरम्यान, या मोहिमेचे पैसे रखडण्यात आले असा आरोप करण्यात आला. पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोणतेही पैसे रखडलेले नाहीत, असा दावा केलाय. जे आवश्यक आहेत, ते पैसे दिलेत आणि उरलेले पैसे आवश्यकतेनुसार देऊ, असंही त्यांनी सांगितलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2015 07:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close