S M L

मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर शिवसैनिकांचं टोल आंदोलन

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2015 01:38 AM IST

मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर शिवसैनिकांचं टोल आंदोलन

nagpur_andolanनागपूर (11 फेब्रुवारी) : एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगला तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच जिल्ह्यात शिवसेनेनं टोल आंदोलन करून सरकारला घरचा अहेर दिलाय. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नागपूर शहरातून बाहेर पडतांना लागणारे पाच टोल नाके बंद करण्यासाठी शिवसेनेनं वानाडोंगरी येथे आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केली. टोलमाफीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळावं अशी मागणी शिवसैनिकांनी केली.दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सतिश हरडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नागपुरातील पाचही टोल नाके बंद करण्याची मागणी केली आहे. जर 10 दिवसांत हे टोलनाके बंद झाले नाही तर आक्रमक आंदोलन केलं जाईल असा इशाराही दिलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2015 08:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close