S M L

केजरींच्या राज्याभिषेकाला मोदी नसणार, बारामतीत पवारांसोबत दिसणार !

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2015 07:27 PM IST

pawar on modi12 फेब्रुवारी : 14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे...जगभरात प्रेमाला उधाण येणारा दिवस...याच दिवशी एकमेकांना पाण्यात पाहणारे राजकारणातील दोन दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहे हे नेते दुसरे तिसरे कुणी नसून ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. हे दोन्ही नेते बारामतीत एकत्र व्यासपीठावर दिसणार आहे. विशेष, म्हणजे पंतप्रधानांना दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीचं आमंत्रण आहे पण पंतप्रधानांना 14 तारखेला बारामतीत असल्यानं ते शपथविधीला उपस्थित राहू शकणार नाहीत.

'पवार-काका पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीकरांना मुक्त करा' गेल्या विधानसभेलाच पवारांवर ही अशी चौफेर टीका करणारे पंतप्रधान त्याच बारामतीत येऊन पवारांच्या विकासकामांचं जाहीर कोडकौतुक करणार आहेत म्हणे.....विशेष म्हणजे....या नव्या राजकीय मैत्रीसाठी पवारांनी दिवसही नेमका प्रेमाचाच निवडलाय.  पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारीला बारामतीच्या दौर्‍यावर असणार आहेत. यावेळी मोदी बारामतीतल्या वेगवेगळ्या विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. त्याची तयारी बारामतीत जोरात सुरू आहे. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती विमानतळावर येतील. त्यानंतर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाची पाहणी करून याच संकुलात उभारलेल्या सीबीएसई माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करतील.

तेथून भिगवण रस्त्याने शारदानगर शैक्षणिक संकुलातील अप्पासाहेब सभागृहाचे उद्घाटन करतील. तेथून कृषी विज्ञान केंद्रातील विविध संशोधन प्रकल्प, शेतीपूरक उपक्रमांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर केंद्र शासनाच्या मदतीने उभारण्यात येणार्‍या सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर व्हेजिटेबल प्रोडक्ट्स या नियोजीत इमारतीचे भूमिपूजन करतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता याच संकुलात होणार्‍या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहुन मार्गदर्शन करतील.

या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग हेही मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यानंतर शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी स्नेहभोजनाचा आनंद घेऊन मोदी हेलिकॉप्टरने पुण्याला रवाना होतील तेथून ते दिल्लीला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शपथ घेणार आहे. या शपथविधीसाठी मोदींना केजरीवाल यांनी आमंत्रण दिलंय. पण 14 तारखेला मोदी बारामतीत असल्यानं ते शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत.

असा असेल मोदींचा बारामती दौरा

14 फेब्रुवारीला सकाळी 11 वा. बारामतीत

विद्या प्रतिष्ठान संकुलाची करणार पाहणी

सीबीएसई शाळेच्या इमारतीचं करणार उद्घाटन

शेती उपक्रमांची करणार पाहणी

सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल प्रोडक्ट्सच्या इमारतीचं भूमिपूजन

दुपारी 12 वाजता शेतकरी मेळाव्यात उपस्थिती

शेतकर्‍यांना करणार मार्गदर्शन

 शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजन

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2015 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close