S M L

मुंबईमध्ये दिवसभरात स्वाईन फ्लूचे 3 बळी

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2015 07:32 PM IST

swine_flu12 फेब्रुवारी : राज्यात स्वाईन फ्लू अर्थात एच 1 एन 1नं पुन्हा डोकं वर काढलंय. आज (गुरुवारी) एकाच दिवशी राजधानी मुंबईत स्वाईन फ्लूनं 3 बळी घेतलेत. त्यामुळे मुंबईतल्या मृतांची संख्या 8 तर एकूण राज्यात ही संख्या 43 वर गेलीय.

राज्यभरात स्वाईन फ्लूनं थैमान घातलंय. 1 जानेवारीपासून राज्यात दिवसाला सरासरी एकाचा स्वाईन फ्लूने बळी घेतलाय. स्वाईन फ्लूचे सर्वात जास्त बळी हे नागपूर जिल्ह्यात गेलेत. नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे 16 जण दगावले आहेत. तर 20 जणांना लागण झालीये. तर राज्यात एकूण 239 जणांना स्वाईन फ्लूची लागण झालेली आहे. दरम्यान, स्वाईन फ्लूशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्य मंत्रीी दीपक सावंत यांनी म्हटलंय. तर घाबरून जाऊ नये आणि थोडा ताप आला तरी डॉक्टरांकडे जावं, एवढी काळजी घेतली तरी पुरे आहे, असा सल्ला आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालकांनी दिलाय.

दुसरीकडे देशभरात स्वाईन फ्लूचा विळखा पसरल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीवरून दिसतंय. फेब्रुवारीच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 216 जणांचा स्वाईन फ्लूनं बळी गेलाय, तर जानेवारीपासून आतापर्यंत 407 जणांनी प्राण गमावले आहेत. गुजरात आणि राजस्थान या राज्यांना स्वाईन फ्लूनं मोठाच तडाखा बसलाय. त्याशिवाय तेलंगणा, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांमध्येही स्वाईन फ्लूनं हातपाय पसरलेत. देशभरात स्वाईन फ्लूचे एकूण 5 हजार 157 रुग्ण असल्याची सरकारची माहिती आहे.

 स्वाईन फ्लूचे बळी - जानेवारीपासूनची आकडेवारी

नागपूर - 16

पुणे - 8

मुंबई - 8

लातूर - 2

औरंगाबाद - 2

अहमदनगर - 2

गोंदिया - 1

जालना - 1

सातारा - 1

नवी मुंबई - 1

पालघर - 1

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2015 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close