S M L

2020पर्यंत मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत आणणार- एमएमआरसी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2015 10:06 AM IST

2020पर्यंत मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत आणणार- एमएमआरसी

13 फेब्रुवारी :  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर' या पहिल्यावहिल्या मेट्रोने मुंबईकरांसह राज्य आणि केंद्र सरकारचे घामटे काढल्यानंतर आता 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या 'मेट्रो-3'चे काम मार्च 2016 पासून सुरू करण्याची घोषणा मुंबई मेट्रो रेल महामंडळातर्फे (एमएमआरसी) करण्यात आली. या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितलं आहे. काम सुरू झाल्यानंतर 2020पर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पामुळे ज्यांची घरं किंवा दुकानं जाणार आहे, त्या नागरिकांना सध्या स्थलांतराच्या भीतीने ग्रासलं आहे. तर आरे कॉलनीमध्ये होणार्‍या कारशेडसाठी तब्बल 2000 झाडं स्थलांतरित करण्याला स्थानिकांचा विरोध आहे. दरम्यान, काळबादेवी आणि गिरगाव येथील प्रकल्पग्रस्तांवर कोणतीही जोरजबरदस्ती न करता त्यांच्याशी चर्चा करूनच जमिनींचे अधिग्रहण केले जाईल, असेही एमएमआरसीतर्फे स्पष्ट केले आहे.

कसा असेल हा प्रकल्प ?

- केंद्र आणि राज्य सरकारचा हा संयुक्त उपक्रम आहे.

- पूर्णपणे भूयारी रेल्वे मार्ग आहे.

- कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशी ही मेट्रो धावेल.

- या मेट्रोमार्गाची एकूण लांबी 32.5 किमी असेल.

- मेट्रोच्या या मार्गावर 27 स्थानकं असतील.

- ही आठ डब्यांची वातानुकूलीत मेट्रो असेल.

- या मेट्रो 3 प्रकल्पाचा अंदाजीत खर्च 23 हजार 136 कोटी रुपये आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2015 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close