S M L

राज ठाकरेंनी पूर्णवेळ व्यंगचित्रकार व्हावं, आशिष शेलारांची टीका

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2015 03:15 PM IST

राज ठाकरेंनी पूर्णवेळ व्यंगचित्रकार व्हावं, आशिष शेलारांची टीका

13 फेब्रुवारी : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या पराभवानंतर राज ठाकरेंनी कार्टूनमधून मोदी सरकारवर टिपणी केली होती. त्यावर शेलारांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे.

'राज ठाकरेंना प्रकाशझोतात येण्याचा नवा मार्ग सापडलेला दिसतोय, त्यांच्या व्यंगचित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राज ठाकरेंनी हा पूर्णवेळ व्यवसाय निवडायला हवा,' असा टोला शेलार यांनी लगावला आहे.

दिल्लीच्या पराभवानंतर राज ठाकरेंनी कार्टूनमधून मोदींवर निशाणा साधला होता. मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरेंनी दिल्ली निवडणुकीच्या निकालावर व्यंगचित्र काढूत भाजपला चिमटा काढला आहे. राज यांनी व्यंगचित्रात मोदी आणि शहा भाजपच्या ट्विन्स टॉवरसारख्या मोठ्या इमारती दाखवल्या असून केजरीवालांच्या विमानाने दोन्ही इमारतींना भगदाड पाडल्याचं व्यंगचित्र रेखाटले आहे तर ओबामा, दिल्लीतील भाजपचा दारुण झालेला पराभव टीव्हीवर पाहत आहेत. ओबामांचा वापर करून दिल्ली निवडणुकांत मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्यांचा दारुण पराभव झाला असं या व्यंगचित्रात साकारलेलं आहे. त्याला आज आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2015 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close