S M L

सरकारी नोकर्‍यांमधील आरक्षणाबाबत सरकारची टाळाटाळ-तटकरे

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2015 05:49 PM IST

sunil tatkare pkg13 फेब्रुवारी : शासकीय नोकर्‍यांमधील 52 टक्के आरक्षणासंदर्भात मॅटने दिलेल्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपिल करण्यासंदर्भात राज्य सरकार टाळाटाळ करतंय असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. तर युती सरकार हे आरक्षण विरोधी आहे,अशी टीका काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही केलीये.

मागासवर्गीयांना नोकर्‍यांमध्ये 52 टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय मॅटने गेल्या 28 नोव्हेंबरलाच रद्दबातल ठरवलाय. मॅटच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सरकारने 90 दिवसांच्या आत म्हणजेच सरकारने अपिल करणं अपेक्षित आहे. पण हा 90 दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यास अवघे 16 दिवस उरले असतानाही राज्य सरकार अजूनही यासंदर्भात कोणतीही हालचाल करत नाहीये. आगामी 16 दिवसांत सरकारने अपील दाखल केले नाही, तर महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, ओबीसींचे नोकर्‍यांमधील आरक्षणच संपुष्टात येऊ शकते.

दरम्यान, हे मॅटने राज्यातील अनुसुचित जाती, जमाती, भटके-विमुक्त आणि इतर मागासवर्गीयांना 52 टक्के आरक्षण रद्द करण्याच्या आदेशाला हायकोर्टात आव्हान न दिल्यामुळे सिद्ध झाल्याची टीका काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी केली आहे. काही अधिकार्‍यांना सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन विभागात सचिवपदी स्वत:ची वर्णी लावायची आहे या ठिकाणी दलित अधिकार्‍यांची वर्णी लागू नये म्हणूनच हा खटाटोप असल्याचा आरोपही नितीन राऊत यांनी केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2015 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close