S M L

सेना-भाजप 'प्रेम अबाधीत' राहण्यासाठी समन्वय समिती

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2015 09:03 PM IST

cm on uddhav13 फेब्रुवारी :शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसात वाद उफाळलाय. त्यामुळे प्रेम अबाधीत राहावा यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीची पहिली बैठक येत्या मंगळवारी होणार आहे. आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहण्याचं ठरणार आहे.

25 वर्षांची युती तुटल्यानंतर सत्तेसाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आले खरे पण दोन्ही पक्षातला वाद काही कमी झाला नाही. अलीकडेच दिल्लीत आम आदमी पार्टीने घवघवीत यश मिळाल्याचं निमित्त साधत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्यमंत्र्यांना मिळत नसलेल्या अधिकारावरून सेना-भाजपमध्ये वाद रंगलाय. यावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षात समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. आज (शुक्रवारी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अनिल देसाई यांनी भेट घेतली. दोन्ही पक्षांतले वाद मिटवण्यासाठी लवकरच समन्वय समितीची स्थापना होणार आहे अशी माहिती दानवे यांनी दिली. देसाई यांनीही याबाबत दुजोरा दिलाय. या समितीची पहिली बैठक मंगळवारी होणार आहे. भाजपकडून रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील तर शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते, अनिल देसाई आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2015 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close