S M L

सोनियांचा विमान प्रवास : खर्च कपातीचा देखावा

14 सप्टेंबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एअर इंडियाच्या विमानानं दिल्ली ते मंुबई असा प्रवास इकॉनॉमी क्लासनं केला. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि तीन स्पोर्ट युटिलीटी व्हॅन होत्या. या व्हॅन कार्गोमधून आणण्यात आल्या. प्रत्येक व्हॅनचा वाहतूक खर्च एक लाख रुपये होता. त्यामुळे हा इकॉनॉमी क्लासचा प्रवास केवळ दिखाव्यासाठी आहे की खरोखरच पैसा वाचवण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सोनियांनी बिझनेस क्लासनं प्रवास केला तर, त्यांच्यासमोरची एक सीट मोकळी ठेवावी लागते. त्यामुळे बिझनेस क्लासची दोन तिकीटं काढावी लागतात. त्याच्या सुरक्षा पथकासाठी इकॉनॉमी क्लासची 6 तिकीटं काढावी लागतात. जर सोनियांनी इकॉनॉमी क्लासनं प्रवास केला तर विमानातल्या पहिल्या 5 रांगा म्हणजे 15 सीट्स सुरक्षा पथकासाठी बुक केल्या जातात. इकॉनॉमी क्सालच्या तिकीटचा दर अंदाजे 3700 रुपये. म्हणजेच सोनियांच्या स्वतःच्या तिकीटासह एकूण रक्कम झाली 55,500 रुपये म्हणजेच सोनियांनी बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासनं प्रवास केला तर, एकूण बचत होते फक्त 10 हजार रुपयांपेक्षाही कमी त्यामुळे युपीए सरकारनं सुरू केलेल्या खर्च कपातीला फारसा अर्थ राहत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 14, 2009 02:43 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2009 02:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close