S M L

नागपुरात 'व्हॅलेंटाईन डे'विरोधात धिंगाणा घालणार्‍या तरुणांना अटक

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2015 08:18 PM IST

nag valentine sena bajrang dal14 फेब्रुवारी : नागपूरच्या बॉटनिकल गार्डन, अंबाझरी उद्यानात मुलींचा विनयभंग आणि त्यांना शिवीगाळ करणार्‍या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या आणि युवासेनेचा पदाधिकारी प्रतिक बहुगुणा याच्यासह पाच जणांविरुद्ध 135 अंतर्गत कारवाईही करण्यात आलीये. या प्रकरणात तक्रार देण्यासाठी मुलीपुढे आल्या तर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाशी शिवसेना किंवा युवासेनेचा संबंध नाही असं शिवसेनेकडून सांगण्यात येत होतं. पण या तरुणांनी विद्यार्थी सेनेच्या

लेटरहेडवर या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवल्यानं शिवसेना अडचणीत आलीये. विशेष म्हणजे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच व्हॅलेंटाईन डेला विरोध करू नये असं आवाहन केलं आहे. पण कार्यकर्त्यांच्या असभ्य कृत्यामधील तरुण विद्यार्थी सेनेचे असल्याचे पुरावे पुढे आल्याने शिवसेना अडचणीत आले आहे. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी या पाच जणांना 135 अंतर्गत अटक केली आहे. या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्याचा विचार पोलीस करत आहेत. पण कालचा प्रकार करणार्‍यांचा शिवसेना किंवा युवासेनेचा कुठलाही संबंध नसल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. अटक करण्यात आलेल्या पाचही जणांवर कडक कारवाई करावी असे शिवसेनेनं स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2015 08:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close