S M L

आज भारत-पाकिस्तान 'मैदान-ए-जंग' !

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2015 09:22 AM IST

आज भारत-पाकिस्तान 'मैदान-ए-जंग' !

india vs pakistan cricket 14 फेब्रुवारी : श्वास रोखून धरा...हो श्वास रोखून धरा...कारण उद्या आहे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध...युद्ध म्हणजेच भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच...आणि ही मॅचही काही कुठल्याही सीरिजची नाही तर वर्ल्डकपमधली विजयी सलामी देणारी मॅच आहे. त्यामुळे उद्याचा संडे सुपरसंडे ठरणार यात शंका नाही.

भारत पाकिस्तान मॅच म्हटलं की, दोन्ही देशांच्या क्रिकेट रसिकांसाठी जीव की प्राण अशीच असते. भारत-पाकमधील तणावामुळे वर्षभरानंतर दोन्ही टीम उद्या आमने सामने येत आहे. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये या मॅचकडे दरवेळी सगळ्यांचं लक्ष असतं. वर्ल्ड कपच्या इतिहासात आजपर्यंत पाकिस्ताननं भारताचा एकदाही पराभव केलेला नाही. त्यामुळे टीम इंडिया ही परंपरा तशीच राखते की, पाकिस्तान एक नवा इतिहास रचते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म चिंताजनक आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अफगाणिस्तानविरुद्धची वॉर्म अप मॅच सोडता भारताला विजय मिळवता आला नाहीये. त्यातच भारतीय बॉलिंग ही टीमसाठी सर्वात मोठी डोकेदुखी आहे आणि म्हणूनच भारतीय बॅटिंगवर टीमची मदार असेल. तर पाकिस्तानची ही टीम नवखी टीम आहे. मिसबाह, आफ्रिदी, युनीस खान वगळता एकही अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे नाही. पण अत्यंत बेभरवशाची टीम म्हणून पाकिस्तानची ओळख आहे. त्यामुळे उद्याची मॅच ही अत्यंत रोमांचक तर असणारच आहे पण जिंकणार कोण याची उत्कंठा सर्वांना लागलीये. आणि हो ही मॅच आणखी एका कारणामुळे मजेदार ठरणार आहे ती अमिताभ बच्चन यांच्या आवाजामुळे. उद्या अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात मॅचची कॉमेंट्री ऐकला मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2015 08:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close