S M L

मुंबई नाईटलाईफच्या प्रस्तावाला महापालिकेची मान्यता- आदित्य ठाकरे

Samruddha Bhambure | Updated On: Feb 15, 2015 01:32 PM IST

मुंबई नाईटलाईफच्या प्रस्तावाला महापालिकेची मान्यता- आदित्य ठाकरे

15 फेब्रुवारी :  युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या 'नाईट लाईफ प्रपोजल'ला मुंबई पोलिसांनी हिरवा कंदील दिला आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांनीच ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची वाट पाहात असल्याचंही आदित्य यांनी यात नमूद केलं आहे.

24 तास धावणार्‍या मुंबईत रात्रीही खाऊगल्ल्या, रेस्टॉरंट, कॅफे, मिल्क शॉप्स, केमिस्ट आणि मॉल्स खुली रहावी, असा आग्रह आदित्य यांनी धरला होता. याला महापालिकेच्या महासभेनेही मंजुरी दिली होती. मात्र मुंबईतील सुरक्षेच्या कारणास्तव आदित्य यांचं 'नाईट लाईफ प्रपोज'ल रेंगाळलं होतं. तसंच काँग्रेसनेही याला विरोध केला होता. आता त्यांना पोलिसांचीही परवानगी मिळाली आहे. खाऊगल्ल्या रात्री सुरू ठेवल्यास मुंबई व्हायब्रण्ट होईल, नाइट लाइफ एन्जॉय करता येईल, असा आदित्य यांचा दावा होता. याशिवाय मुंबईपाठोपाठ ठाणे, नाशिक आणि पुण्यातही नाइट लाइफ रात्रभर सुरू ठेवण्यात यावी अशीही मागणी आदित्य यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी परवानगी दिल्याबद्दल आदित्य यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांचे आभार मानले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2015 11:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close