S M L

पुरस्कार परत मागण्याचा सल्ला देणे हा बालिशपणा -नेमाडे

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2015 10:17 PM IST

nemade3315 फेब्रुवारी : इंग्लंडमधल्या नागरिकांना खुश करण्यासाठी सलमान रश्दी भारतीयांविषयी वक्तव्य करतात,अशा शब्दात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तसंच पुरस्कार मिळालाय तो मिळाला आणि तो जर परत करण्याची कुणी भाषा करत असले तर ते बालिशपणाचे आहे अशा टीकाही त्यांनी खांडेकर यांचं नाव न घेता केली.

नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते नेमाडे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी नेमाडे यांनी राज्यापालांना कोसला कादंबरीची इंग्रजी प्रत भेट दिली. राजभवनावर झालेल्या सत्कार प्रसंगी नेमाडेनी रश्दी आणि विनय हर्डीकरांवर टीका केली. तसंच वि. स. खांडेकर आणि विंदा करंदीकर यांच्याविषयी मी खरं लिहिलंय. त्यामुळे,पुरस्कार परत करायचा असल्यास त्यांनी करावा असंही नेमाडे म्हणाले. तसंच नेमाडेंसारख्या वृद्ध माणसाने गुपचूप पुरस्कार स्वीकारून आभार मानावेत, अशा शब्दात सलमान रश्दी यांनी नेमाडेंवर टीका केली होती. रश्दी यांच्या टीकेचा नेमाडेंनी खरपूस समाचार घेतला. इंग्लंडमधील नागरिकांना खुश करण्यासाठी रश्दी असं वक्तव्य करत आहे असा टोला नेमाडेंनी लगावला. मी जे लिहिलंय ते सत्य लिहलंय. जर कुणी पुरस्कार परत करण्याची भाषा करत असेल त्यांनी अगोदर पुरस्कार परत करावेत. आता असं बोलणं हे बालिशपणाचं लक्षण आहे असा टोलाही नेमाडेंनी लगावला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2015 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close