S M L

सरकार कुणाच्या सल्ल्यानं चालतं हे कालच कळलं, रावतेंचा टोमणा

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2015 10:31 PM IST

सरकार कुणाच्या सल्ल्यानं चालतं हे कालच कळलं, रावतेंचा टोमणा

ravate on pawar3315 फेब्रुवारी : केंद्रातलं भाजप सरकार हे नेमकं कोणाच्या सल्ल्याने चालतं हे आम्हाला कालच कळलं, असा टोमणा शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी भाजपला मारलाय. ते पुण्यात बोलत होते.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. शरद पवार यांच्या राजकारणातला अनभूव मोठा आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पवारांशी आपलं महिन्यातून किमान दोन तीनदा फोनवरून बोलणं होत असतं असा खुलासा मोदींनी आपल्या भाषणात केला होता. अगोदरच शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यावर रावतेंनी भाजपला चांगलाच टोमणा मारला. केंद्रातलं भाजप सरकार हे नेमकं कोणाच्या सल्ल्याने चालतं हे आम्हाला कालच कळलं, याबद्दल आमचे पक्षप्रमुखच निर्ण घेतील असं सांगण्यासही रावते विसरले नाही. रावतेंच्या या बोचर्‍या विधानामुळे युती सरकारमध्ये अजूनही धुसफूस सुरू असल्याचंच स्पष्ट होतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2015 10:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close