S M L

हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथकं तैनात -मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Feb 16, 2015 08:00 PM IST

fadnavis on pimpri gril10 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरें यांच्यावरचा हल्ला अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्हच असून हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची 10 पथकं तातडीने तयार करण्यात आली आहेत. हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी राज्यभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचे आमचे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर आज (सोमवारी) सकाळी कोल्हापूरमध्ये राहत्या घराजवळ दोन अज्ञान व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पानसरेंवर हल्ला धक्कादायक आणि निषेधार्ह हल्ला असून हल्लेखोरांना तातडीने पकडण्याची सुचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्याचं बरोबर या हल्ल्याचा राज्यसरकार कोणत्याही परिस्थितीत याचा छडा लावेल असं अश्वासनंही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

हा प्रकार गंभीर असून कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचं पूर्ण लक्ष आहे. आरोपींना अटक झाली पाहिजे या दृष्टीने पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे, असंही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2015 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close