S M L

राज यांचा निरुपम यांना ठाकरी सल्ला

16 सप्टेंबर मराठी द्वेषी वक्तव्य कराल तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी संजय निरूपम यांना दिला आहे. उत्तर भारतीयांना महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे अशी मागणी काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी नागपुरात केली होती. निरुपम यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीत पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा गाजणार असं स्पष्ट झालं आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबई आणि ठाण्याचं सत्ता समीकरणातलं वाढलेलं महत्व पाहता सगळ्याच राजकीय पक्षांनी या शहरांकडे राजकीयदृष्ट्या जास्त लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. या दोन्ही शहरांमध्ये उत्तर भारतीयांची वाढलेली संख्यापाहता काँग्रेसनं पुन्हा एकदा परप्रांतीयांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निवडणुकीतही मराठीचा मुद्दा मांडणार असल्याचं सांगतानाच परप्रांतीयांबाबतची आपली भूमिका कायम ठेवली आहे. आता संजय निरुपम यांनी ऐन निवडणुकीत उचललेल्या या मुद्याला शिवसेना आणि मनसे काय उत्तर देतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2009 09:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2009 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close