S M L

राष्ट्रकूल स्पर्धा वेळेवर होतील- सुरेश कलमाडी

16 सप्टेंबर2010 मध्ये नवी दिल्लीत होणारी राष्ट्रकूल स्पर्धा ठरल्याप्रमाणे आणि सुरळीत पार पडेल असा विश्वास भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रकूल स्पर्धा फेडरेशनचे अध्यक्ष माईक फेनेल गेल्याच आठवड्यात दिल्लीत आले होते. त्यांनी राष्ट्रकूल स्पर्धा नगरीतल्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर स्पर्धेचं बांधकाम रखडल्याबद्‌दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. भारतीय पंतप्रधानांनी हस्तक्षेप करुन स्पर्धेचं आयोजन यशस्वी करावं, अशी विनंतीही त्यांनी केली होती. फेनेल यांच्या वक्तव्याला उत्तर देताना मंगळवारी कलमाडी यांनी स्टेडिअमचं बांधकाम वेळेत पूर्ण होईल असं आश्वासन दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 16, 2009 01:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2009 01:26 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close