S M L

नागपुरात स्वाईन फ्लूचे आणखी 2 बळी, मृतांची संख्या 30 वर

Sachin Salve | Updated On: Feb 17, 2015 07:15 PM IST

नागपुरात स्वाईन फ्लूचे आणखी 2 बळी, मृतांची संख्या 30 वर

swine flu nagpur17 फेब्रुवारी : स्वाईन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय. नागपुरात स्वाईन फ्लूची लागण झालेल्या दोन जणांचा आज मृत्यू झालाय. एकट्या नागपुरात स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या 30 झाली आहे.

आज एका 65 वर्षाची वृद्ध महिलेचा आणि 50 वर्षांच्या एका व्यक्तीचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडीकलने पाठवलेल्या पाच संशयित रुग्णांच्या नमुन्यांपैकी तीन नमुने पॉझिटिव्ह आल्याने स्वाईन फ्लूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 136 झाली आहे. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दोन मुले आणि एका 30 वर्षीय महिलेचाही समावेश आहे.

 दरम्यान, राज्यात स्वाईन फ्लूचा जोर असल्याने महाराष्ट्रात येणार्‍या पर्यटकांवर परिणाम होत नसून स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2015 07:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close