S M L

दाभोलकरांच्या खुनाचा तपास करण्यात कमी पडलो-चव्हाण

Sachin Salve | Updated On: Feb 17, 2015 09:28 PM IST

cm on dabholar case17 फेब्रुवारी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यात आम्ही सरकार म्हणून अपयशी ठरलो, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीये. पण याचा अर्थ आमची राजकीय इच्छाशक्ती नव्हती असा नाही, अशी सारवासारवही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते कोल्हापुरात बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कोल्हापूरच्या ऍस्टर हॉस्पिटलला भेट देऊन कॉ. गोविंद पानसरेंच्या प्रकृतीची चौकशी केली. दाभोलकर आणि पानसरेंवरचा हल्ला एकाच प्रवृत्तीतून झालेला असून राज्य सरकारने सर्व यंत्रणा कामी लावावी असा सल्ला चव्हाण यांनी दिलाय.

तसंच दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेताना राज्य सरकार कमी पडलं होतं. सरकारने पूर्ण बाजूने तपास केला पण त्यात अपयश आलं असंही चव्हाण म्हणाले. चव्हाण यांनी याअगोदरही दाभोलकर प्रकरणात तपासात कमी पडलो अशी कबुली दिली होती. एवढंच नाहीतर पुणे पोलिसांनीही तपासात हात टेकले असल्याची जाहीर ग्वाही दिली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2015 09:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close