S M L

शिवजयंतीवरून शिवसेनेची पंचाईत!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 19, 2015 03:35 PM IST

शिवजयंतीवरून शिवसेनेची पंचाईत!

19 फेब्रुवारी : शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असली, तरी आता सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेचे मंत्री शासनाच्या निर्णयाप्रमाणे गुरुवारी तारखेने शिवजयंती साजरी करणार आहेत. मात्र  शिवसेना तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.

राज्याभरात शिवजयंती तारखेनुसार साजरी केली जाते. शिवसेना मात्र शिवजयंती कायम तिथीनुसारच साजरी करते. सनई चौघड्याचा निनाद, ढोल ताशांचा गजर, भव्य मिरवणूक आणि शिवरायांच्या जयघोषात शिवसेना पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करते. आता शिवसेना सरकारमध्ये सामील असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री यावेळी शासकीय शिवजयंतीत सहभागी होणार का, यावरुन पक्षासमोर पेच निर्माण झाला होता. पण शिवसेनेने यावर सोयीस्कर भूमिका घेतली आहे.

दरम्यान, अरबी सुमद्रात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याचा मुहूर्त हुकला आहे. शिवजयंतीला म्हणजेच 19 फेब्रुवारीला होणारं भूमीपूजन पुढे ढकलण्यात आलं आहे. पर्यावरण विभागाच्या परवनग्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे शिवस्मारकाचं भूमीपूजन महिनाभर पुढे ढकलण्यात आलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2015 08:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close