S M L

तंबाखूवर बंदी घालण्यासाठी लवकरच कडक कायदा करणार - दीपक सावंत

Samruddha Bhambure | Updated On: Feb 18, 2015 08:41 PM IST

तंबाखूवर बंदी घालण्यासाठी लवकरच कडक कायदा करणार - दीपक सावंत

18 जानेवारी :  आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारने आता तंबाखू सेवनाबाबत कडक कायदा करण्याचे मनावर घेतलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तंबाखू बंदीबाबतच्या कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार असून लवकरच कडक कायदा अस्तित्वात आणणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं आहे.

आर. आर. पाटील यांना तंबाखू सेवनामुळेच कर्करोगाचा सामना करावा लागला होता. त्यातच त्यांचं निधन झाले. राज्यात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता तंबाखू सेवन थांबवण्यासाठी कडक कायदा करण्याची गरज असल्याचे दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. त्यासाठी राज्य सरकार नवीन कायद्याचा विचार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही काल (मंगळवारी) IBN लोकमतशी बोलताना तंबाखूच्या व्यसनाबद्दल चिंता व्यक्त केली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2015 08:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close