S M L

क्रिकेटच्या मैदानात पवार पुन्हा 'बॅटिंग'साठी उतरले !

Sachin Salve | Updated On: Feb 19, 2015 04:50 PM IST

क्रिकेटच्या मैदानात पवार पुन्हा 'बॅटिंग'साठी उतरले !

pawar_mca19 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा क्रिकेटच्या राजकारणात 'बॅटिंग' करण्यास उतरले आहे. शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एजीएमच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवत मागच्या दोन बैठकींना उपस्थिती लावलीये. शिवाय 2 मार्चला होणार्‍या बीसीसीआय सोबतच्या बैठकीत एमसीएचं प्रतिनिधित्व आपणच करणार असल्याचं पवारांनी जाहीर केलंय. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणुकीत पवारांचं 'कमबॅक' होण्याची शक्यता आणखी वाढलीये.

राजकारणाच्या पटलावर आपला दबदबा निर्माण करणारे शरद पवार यांनी क्रिकेटच्या मैदानावरही 'इनिंग' पेश केली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार नव्याने कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. यावर्षी ईस्ट झोनचे ते अध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. एन.श्रीनिवासन यांची ईस्ट झोनवर चांगली पकड आहे. पण त्यांनी माघार घेतल्यास शरद पवार पुन्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात. याअगोदर शरद पवार यांनी बीसीसीआयचं 2005 ते 2008 दरम्यान, अध्यक्षपद भूषवलंय. सध्या ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. अशातच त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एजीएमच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवत मागच्या दोन बैठकींना उपस्थिती लावलीये. आणि यापुढच्या दोन्ही बैठकीचं प्रतिनिधित्वही करणार असल्याचा दावा पवारांनी केलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2015 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close