S M L

युतीच्या नावानं चांगभलं ; सकाळी टीका, दुपारी बैठक !

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2015 03:30 PM IST

युतीच्या नावानं चांगभलं ; सकाळी टीका, दुपारी बैठक !

shinde meet cm23 फेब्रुवारी : एकीकडे 'सामना'तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका तर दुसरीकडे सेनेचे नेते युतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर असा दुहेरी योगायोग आज पाहण्यास मिळाला. सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्थानिक निवडणुकीसाठी युतीची चर्चा केलीये.

'पटकथा तीच;नायक नवा' या शिर्षकाखाली शिवसेनेनं आपलं मुखपत्र 'सामना'मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. अग्रलेखातून गृहखाते हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्याची जाणिव करून देण्यात आलीय. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांचं अपयश मुख्यमंत्री सिस्टिमवर कदापिही ढकलू शकत नाहीत असंही सुनावण्यात आलं. मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी बदलले, पण प्रशासकीय व्यवस्था तीच आहे. राज्यकर्ते येत जात असतात, सिस्टीम तीच असते. मुख्यमंत्र्यांना ती मान्य नसेल तर त्यांनी सिस्टीमचा चेहरा बदलायला हवा. सरकार बदलले, पण महाराष्ट्रात काय बदलले ? असा खडा सवाल विचारण्यात आलाय.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेनेचे ठाणे जिल्ह्यातले प्रमुख नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक निवडणुकांसंदर्भात युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या बैठकीत नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मनपा निवडणुकीत सेना-भाजपने युती करण्यासंदर्भात चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. एकनाथ शिंदे बैठकीतला अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहाचवतील आणि त्यानंतरच स्थानिक पातळीवर युती करायची की नाही याचा निर्णय होईल असं शिवसेना सूत्रांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, बैठकीनंतर आम्ही एकत्र आहोत एवढीच प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तर सकारात्मक चर्चा झाली अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2015 03:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close