S M L

रेल्वे कर्मचार्‍यांच्या पासेसवर 2,000 कोटींचा चुराडा ?

Sachin Salve | Updated On: Feb 24, 2015 12:41 PM IST

323rail_budget201424 फेब्रुवारी : 'रेल्वेनं मोफत प्रवास करू नका' अशी टीमकी रेल्वे प्रशासनाकडून वाजवली जाते. पण रेल्वेचे कर्मचारीच फुकटे निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. रेल्वेच्या कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांना रेल्वेचे वार्षिक पास देण्यामागे रेल्वेचे किती उत्पन्न बुडत याचा कुठलाही हिशेब रेल्वेकडे नाही अशी माहिती माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघड झाली आहे. दरवर्षी अंदाजे 2 हजार कोटी या पासेसासाठी खर्च होतात असा अंदाज आहे.

दरवर्षी रेल्वेच्या 14 लाख कर्मचार्‍यांना आणि 11 लाख निवृत्त कर्मचार्‍यांना पासेस दिले जातात. यात कर्मचार्‍यांना वार्षिक 3 आणि अधिकार्‍यांना 6 पासेस दिल्या जातात. या पासेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांना तिकीटे मिळत नाही किंवा त्यांचे तिकीट कन्फर्म होत नाही. दरवर्षी अंदाजे 2,000 कोटी रुपये या पासेसमुळे उत्पन्न बुडत असल्याचा अंदाज आहे. नागपूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते अविनाश प्रभुणे यांनी विचारलेल्या माहितीत रेल्वेनं या पासेस संदर्भात काहीही हिशेब नसल्याचं सांगितलंय. यात धक्कादायक म्हणजे या पासेससाठी खर्च होणार्‍या पैशावर कुठलाही कर लावण्यात येत नाही. त्यामुळे या पासेस संदर्भात हिशेबाची यंत्रणा तयार करण्याची मागणी होत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close