S M L

'गेल' वादळाचा झंझावात, झळकावली रेकाॅर्डब्रेक डबल सेंच्युरी

Sachin Salve | Updated On: Feb 24, 2015 05:20 PM IST

'गेल' वादळाचा झंझावात, झळकावली रेकाॅर्डब्रेक डबल सेंच्युरी

24 फेब्रुवारी : वर्ल्डकपमध्ये आज ख्रिस गेल नावाच्या वादळाच्या झंझावाताने झिम्बाबेची दाणादाण उडाली. ख्रिस गेलने तडाखेबाज बॅटिंग करत डबल सेंच्युरी ठोकलीये. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गेलने 147 बॉल्समध्ये 10 फोर आणि 16 सिक्स ठोकत तब्बल 215 रन्स करून पहिली डबल सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड रचलाय.

आज (मंगळवारी) वर्ल्ड कपच्या वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाबेच्या मॅचमध्ये रन्सची आतषबाजी पाहायला मिळाली. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच 200 रन्सचा पाऊस पडला. ख्रिस गेलनं सुरुवातीपासून झिम्बाव्वेच्या बॉलर्सचा समाचार घेत वर्ल्ड कपमधील हायेस्ट स्कोर केला. गेलनं 147 बॉल्समध्ये 10 फोर आणि 16 सिक्स ठोकत तब्बल 215 रन्स तडकावले. तर त्याला मार्लन सॅम्यूअल्यनं मजबूत साथ दिली. सॅम्यूअल्सनं 156 बॉल्समध्ये 11 फोर आणि 3 सिक्स ठोकत 133 रन्स केले. या दमदार पार्टनशिपच्या बळावर विंडीजनं झिम्बाब्बेच्या समोर विजयासाठी 373 रन्सचा डोंगर उभारलाय. विशेष म्हणजे वर्ल्डकपच्या इतिहासात भारतीय फलदाजांनी आपला दबदबा कायम ठेवला होता. सौरभ गांगुली, कपील देव, वीरेंद्र सेहवागने सर्वाधिक रन्स केले आहे. त्याचबरोबर व्हिव रिचर्ड्स आणि साऊथ ऑफिक्रेचा बॅटसमन गॅरी कर्स्टननेही सर्वाधिक रन्सचा डोंगर रचलाय. आज मात्र, गेल नावाच्या वादळात सर्व रेकॉर्ड वाहून गेले.

आत्तापर्यंतच्या वर्ल्डकपमधील हायेस्ट इनिंग्ज

ख्रिस गेल - 215 वि. झिम्बाब्बे (2015)

गॅरी कर्स्टन - 188* वि. UAE (1996)

सौरव गांगुली - 183 वि. श्रीलंका (1999)

व्हिव रिचर्ड्स - 181 वि. श्रीलंका (1987)

कपिल देव - 175* वि. झिम्बाव्वे (1983)

वीरेंद्र सेहवाग - 175 वि. बांगलादेश (2011)

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 01:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close