S M L

राहुल गांधींच्या सुटीची वेळ चुकलीच- दिग्विजय सिंग

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2015 08:14 PM IST

11-digvijay-singh-60224 फेब्रुवारी : राहुल गांधी यांना सुटीसाठी योग्य वेळ निवडता आली असती, असे सूचक विधान करून दिग्विजय यांनी आपली नाराजी व्यक्त केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सुटीवर गेल्याने निर्माण झालेल्या वादावर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

ऐन अर्थसंकपल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राहुल गांधी यांनी सुटी घेतल्याने पक्षात नाराजीचे वातावरण आहे. पक्षाच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी राहुल गांधी सुटीवर जाणार असतील तर यात काहीच गैर नाही. फक्त या सुटीसाठी योग्य वेळ निवडण्याची गरज होती, असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होत असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. यात भर म्हणजे ऐन अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या अधिवेशन काळात पक्षाच्या उपाध्यक्षानेच सुटी घेतल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षातल्या काही जुन्या नेत्यांवर राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात एप्रिलमध्ये होणार्‍या काँग्रेस अधिवेशनात राहुल यांना पक्षाध्यक्ष करण्यात येणार असल्याने रणनीती ठरवण्यासाठी त्यांनी सुटी घेतली माहिती सूत्रांकडून मिळतं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 08:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close