S M L

भाजप आणि शिवसेनेत मतभेद नाही - रावसाहेब दानवे

Samruddha Bhambure | Updated On: Feb 24, 2015 10:35 PM IST

भाजप आणि शिवसेनेत मतभेद नाही - रावसाहेब दानवे

Raosaheb_Danve24 फेब्रुवारी : भाजप आणि शिवसेनेत कोणतेही मतभेद नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची बैठक आज (मंगळवारी) मुंबईतील सह्याद्रीवर पार पडली.

या बैठकीत दोन्ही पक्षांनी मंत्रीमंडळातले वाद, सामनाच्या अग्रलेखातून होणारी टीका अशा अनेक मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीला भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील तर सेनेच्या वतीनं दिवाकर रावते आणि सुभाष देसाई उपस्थित होते.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेत मतभेद नाहीत असं रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर सांगितलं. तसचं 4 मार्चला दानवे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2015 10:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close