S M L

पानसरेंबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार अमोल पाटील ताब्यात

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2015 05:11 PM IST

पानसरेंबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार अमोल पाटील ताब्यात

amol patil facebook25 फेब्रुवारी : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकणार्‍या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अमोल पाटील असं या तरूणाचं नाव आहे. या पोस्टमध्ये चक्क धमकी देण्यात आली होती. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यानंतर आता खेडेकर अशी ही पोस्ट होती.

पानसरेंचे जावई आणि कार्यकर्ते यांनी तोंडी तक्रार दिल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं तक्रार नोंदवली आणि अमोल पाटीलला औरंगाबादहून ताब्यात घेण्यात आलं. त्याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. अमोलच्या पोस्टला लाईक किंवा शेअर करणार्‍यांवरही पोलीस कारवाई करण्याची शक्यता आहे. कॉम्प्युटर इंजिनिअर असलेला अमोल कट्टर विचारसरणीचा आहे.

कोण आहे हा अमोल पाटील ?

- अमोल हा मूळचा औरंगाबादचा कॉम्प्युटर इंजिनियरींगचा विद्यार्थी आहे

- सूत्रांच्या माहितीनुसार जहाल हिंदुत्ववादी विचारसरणीचं समर्थन करणारा आहे

- ही पोस्ट नंतर फेसबूकवरून हटवण्यात आली पण व्हॉट्सऍपवरून ती शेअर होत आहे

काय लिहलं अमोल पाटीलने फेसुबक पोस्टवर

- 'नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर गोविंद पानसरेही बाद, आता खेडेकरांचा नंबर, खुब जमेगा रंग जब मिल बैठेगे तीन यार' अशी पोस्ट अमोलने फेसबुकवर टाकली होती

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2015 05:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close