S M L

धक्कादायक, बिल्डरला गुंडांकडून गावठी बॉम्ब गिफ्ट !

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2015 05:37 PM IST

धक्कादायक, बिल्डरला गुंडांकडून गावठी बॉम्ब गिफ्ट !

nashik gavathi bomb25 फेब्रुवारी : नाशिकमधील एका नामवंत बिल्डरला गुंडांनी पार्सलमधून चक्क गावठी बॉम्ब पाठवला. महापालिकेच्या समोर असलेल्या इमारतीच्या आवारात हा गावठी बॉम्ब पोलिसांच्या बीडीडीएस पथकानं निकामी केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडालीय.

बिल्डर अनंत राजेगावकर आणि अनिल जैन यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. आज जैन यांच्या ऑफिसमध्ये एका पार्सलमधून गावठी बॉम्ब पाठवण्यात आला. या बिल्डिंगचा सुरक्षारक्षक हे निवृत्त सैन्य अधिकारी असल्याने त्यांना पार्सलमध्ये बॉम्ब असल्याचा संशय आला. तेवढ्यात जैन यांना फोन आला आणि पार्सल तुम्हीच उघडा, एवढं सांगून फोन कट झाला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलीस, बीडीडीएस पथक आणि एटीएसचं पथक घटनास्थळी पोहचली आणि बॉम्ब निकामी करण्यात आला. पण, या सर्व प्रकारामुळे खंडणी वसूल करण्यासाठी गुंडांनी नवीन मोडस ऑपरेंडी शोधून काढल्याचं बोललं जातंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2015 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close