S M L

'भूसंपादना'वरून भाजप-सेनेत राडा, शिवसैनिक करणार जनजागृती !

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2015 06:07 PM IST

'भूसंपादना'वरून भाजप-सेनेत राडा, शिवसैनिक करणार जनजागृती !

25 फेब्रुवारी : भूसंपादन विधेयकावरून एकीकडे वाढता विरोध आणि त्यातच आता एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनंही घरचा अहेर दिलाय. हा वटहुकूम शेतकर्‍यांच्या हिताचा नाही असा दावाच सेनेनं केलाय. एवढंच नाहीतर शिवसैनिक आता गावपातळीवर जाऊन शेतकर्‍यांना हे पटवूनही सांगणार आहे असा आदेशच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. त्यामुळे भाजपाची चांगलीचे डोकेदुखी वाढलीये.

'सबका साथ, सबका विकास' असं आश्वासन देणारं मोदी सरकार सुधारित भूसंपादन विधेयकामुळे चांगलंच अडचणीत सापडलंय. संसदेत आणि संसदेबाहेर विधेयकाला वाढत्या विरोधामुळे भाजपाची 'परीक्षा' आणखी अवघड होत चाललीये. एवढंच नाहीतर भूसंपादन विधेयकाचा वटहुकूम काढण्याची तयारीही सरकारने केलीये. त्यावर सर्वच स्तरातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. एनडीएच्या घटक पक्षांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी तर आता 'यामुळे बुरे दिन' येतील अशी संतप्त प्रतिक्रिया नोंदवलीये. एवढंच नाहीतर आजच्या बैठकीतूनही शेट्टी यांनी वॉकआऊट केलंय. राजू शेट्टींपाठोपाठ आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कडाडून विरोध केलाय. आताच्या स्वरूपातल्या भूसंपादन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा नाही. याबाबत दिल्ली शिवसेना खासदारांची आज एक बैठक झालीय. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वटहुकूमाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. भूसंपादन वटहुकूम शेतकर्‍यांच्या हिताचा नाही, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. गावपातळीवर संपर्क वाढवा. प्रत्येक गावात शिवसेनेचा गटप्रमुख नेमा आणि काम सुरू करा असे आदेश उद्धव यांनी शिवसैनिकांना दिले आहे. तसंच संपर्कप्रमुखांनी आपापल्या जिल्ह्यात भेटी वाढव्यात असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. दरम्यान, त्याअगोदर उद्धव यांनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं होतं. शेतकर्‍यांनी मोठ्या विश्वासानं युतीला सत्ता मिळवून दिली आहे. त्यांचा गळा घोटण्याचं पाप करू नका असं, अशा शब्दात उद्धव यांनी भाजपला ठणकावून सांगितलंय. तर दुसरीकडे भूसंपादन कायद्याला विरोध असणार्‍यांना आम्ही मुद्दा पटवून देवू, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2015 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close