S M L

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्या अनिकेतचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Feb 25, 2015 09:00 PM IST

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुरड्या अनिकेतचा मृत्यू

osmanabad25 फेब्रुवारी : उस्मानाबाद जिल्ह्यात केशेगाव या गावामध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या अनिकेत पाटोळे या 4 वर्षांच्या मुलाचा अखेर मृत्यू ओढावलाय. अथक प्रयत्नांनंतरही त्याला वाचवण्यात प्रशासनाला अपयश आलंय.

अनिकेतचे आई वडील ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोडीसाठी ते केशगाव शिवारातल्या शेतात आले होते. आज सकाळी 9 वाजता अनिकेत खेळता खेळता 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. त्याला वाचवण्यासाठी प्रशासन आणि गावकर्‍यांनी शर्थीचे प्रयत्न केले. साडेअकरा वाजता त्याला बाहेर काढण्यात यश आलं, तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचारांसाठी उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालायात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2015 09:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close